Wednesday 27 February 2013

Hindi Jokes - वैलेंटाइन कार्ड

ladki patane ke tarikeलड़की (दुकानदार से): भैया आप के पास ऐसा वैलंटाइन कार्ड है जिसमें लिखा हो…

यू आर माई फर्स्ट एंड लास्ट लव‘?

दुकानदार: हां है.

लड़की: ठीक है, 50 दे दो.

vergine गर्ल << Back

संताने एकदा स्वतःचे लग्न मोडले.
तेव्हा बंता त्याला म्हणाला का रे लग्न का मोडले तू
संता म्हणाला कि आरे ती मुलगी vergine आहे.
मग
मग, जी आज पर्यंत कोणाचीही झाली नाही,
ती माझी कशी काय होऊ शकेल.

थोडे हसूया (विनोद )

बबनराव एकदा डॉक्टरकडे गेले आणि सतत पोट बिघडते अशी तक्रार त्यांनी डॉक्टरला सांगितली .
डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला कि सकाळी उठल्यावर गरम पीत जा !
बबनराव तक्रारीच्या स्वरात म्हणले " अहो डॉक्टर साहेब ते तर मी गेल्या तीस वर्षापासून पितो आहे पण माझी
बायको त्याला चहा म्हणते."

चायनीज बोकड !

संता मार्केटमध्ये जातो तेव्हा...
संता: काका, बोकड किती रुपयांचा आहे ?
दुकानदारः 200 रुपये.
संता: इतका स्वस्त?
दुकानदारः अरे, हे बोकड चायनीज आहे.
संता: त्याची गॅरंटी!
दुकानदार: नो गॅरंटी...तो उद्या भूंकूही शकतो !!!

रजनीकांत

गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.

> संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन
मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.


> एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच
तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.


> अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे
म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’ 


> एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट
रजनीकांत कसा करेल?


> रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला
द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.


> एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!


> रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला
अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.


> एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘
उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात.
रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’
 


> एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

> ‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार
स्टारचे रेटिंग दिले.


> देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’
असे उद्गारतो.


> रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.


> त्सुनामी कशा तयार होतात..
अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे..
प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?


> लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’
म्हणून प्रसिद्ध आहे.
 


> न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती
आजतागायत आंधळी आहे.


> रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.


> रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.


> पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता..
तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.


> इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.


> रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग


> मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा
रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.
 


> रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार
असल्याचे जाहीर करून टाकले.


> रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर
फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे
प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’


> संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही,
अशी त्यांची तक्रार आहे.


> रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते.
तरीही तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.
 


> रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.

> प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते,
ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.


> एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली..
सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.


> रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून,
ब्लूटुथवरून.


> ‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने
ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.
 


> रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना
होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’
दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’


> प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’
मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस
फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता
उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर
बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’
प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’


> ‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून
मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’
 


> एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला
बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.


> एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस
थांबवण्यात आला.


> एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून
काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.


> एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड,
जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून
मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत,
रजनीकांत. येन्ना रास्कला.’’
 


> एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन
पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट
फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?


> एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली..

तो झाडूसह आकाशात फेकला गेला..

> एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला.
त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.

> हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिश’
मध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.


> एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!


> रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला 

सगळं काही ठाऊक आहे?’’
रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’


> ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’
असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात
मोजता येत नाही.


> दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.

> रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.


> कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.


> एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक
जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘
ढिशक्यांव!!!!’
 


> सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल,
त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर
घालायची असं ठरलं होतं..


> ‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला
होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक
वाटलं म्हणे!


> एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा
गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?


> रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.
 


> मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना
फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच
डिलिट करून टाकेल!!


> नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये


> 2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क
वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे
, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.
 


> आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती
मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’


> चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण,
दक्षिणेला रजनीकांत आहे!!!


> रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी
महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.


> रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर
वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.


> रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा
त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला
हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.
 


> गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं
कोणाला माहिती नाही.

 
 

बायका

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?


पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... "पुरे झाकी तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ...."थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... "ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... "केसाने गळा कापलात की हो माझा."
डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... "नुसत्या पुड्या सोडु नका."

स्वल्पविराम

एकदा ना. सी. फडके अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?

त्यावर ते म्हणाले, योग्य वेळ आल्यावर मी सांगीन, त्यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता,

ते म्हणाले, " मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ."

ही गोष्ट लगेचच सौ. फडकेंनी श्री. फडक्यांच्या कानावर घातली.

त्यांनी अत्र्यांकडे याबाबत विषय काढला, तेंव्हा अत्र्यांनी स्पष्टिकरण दिले,

"मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ. "

काळ बदललाय

वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो...
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!

Different wives fighting with husband

Pilot's wife - गेलास उडत ...
Teacher's wife - मला शिकवू नका ...
Painter's wife - थोबाड रंगवीन ...
Dhobi's wife - चांगली धुलाई करीन ...
Teli's wife - गेलास तेल लावत ...
Actor's wife - कशाला उगाच नाटकं करता ...
Vani's wife - उगाच पुड्या सोडू नका ...
Dentist's wife - दात तोडून हातात देईन ...
CA's wife - हिशोबात राहा ...

देव आणि पप्पू

देव :- काय पाहिजे?

पप्पू :- पैशांनी भरलेली बग, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव :- तथास्तु !!!

आज पप्पू मुलींच्या कॉलेजमध्ये बस कंडक्टर आहे !!!

मोठी झाल्यावर तू काय करणार

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

मुली लग्न का करतात

* एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी
* गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन
* जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन
* पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी
* आई-बापावर दया म्हणुन
* मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ?
* नव्या नव्या डिझाईन्सची मंगळसुत्रं घालायला मिळावी म्हणुन...
* नव-याच्या जिवावर मुलांची हौस भागवता येते - फ्रींज बेनिफिट
* मुक्त होण्यासाठी - लग्नच केलं नाही तर मुक्ती कशी आणि कुणापासुन मिळणार?
* आपल्या पाककृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्यावर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा 'बकरा' मिळतो
* लग्नानंतर मुली उजळतात म्हणे ... फेअरलेस क्रीम फासुन थकल्यावर एक शेवटचा 'जालीम' उपाय म्हणुन

इरसाल

गावातल्या शाळेतील चिडके शिक्षक वर्गात आले. नेहमीप्रमाणे त्यांनी टेबलावर डसटर आपटले.
"शांत बसा", अशी गर्जना केली. वर्ग शांत झाला तसे ते हसतमुखाने प्रेमळ स्वरात म्हणाले,
"मु ऽऽ लां ऽऽ नो आज मी खूप खूप खुश आहे.सांगा बरे कशामुळे? "
पोरं एका सुरात म्हणाली, "सर कशामुळे?"
सर म्हणाले, "ओळखा पाहू?"
पोरे एका स्वरात म्हणाली, "आम्ही नाही, तुम्हीच सांगा."
सर आढेवेढे घेत म्हणाले," अस्सं म्हणता, मग मीच सांगतो. आज ना मला मुलगा झाला."
पोरांनी टाळ्या वाजवल्या.खुश होऊन गुरुजींनी एक डबा पिशवीतून काढुन टेबलावर ठेवला.
प्रश्न केला, " ओळखा पाहू तुमच्यासाठी डब्यात काय बरे आणले असेल?"
पोरं तोंडात बोट घालून एकमेकांकडे पाहू लागली. तेवढ्यात मागच्या बाकावरील एक कारट बाकड्याखाली तोंड लपवून केकाटलं,
"खरवस!"

सुहास उठ

आई : अरे सुहास ऊठ. तुला कॉलेजला जायचे आहे ना ?
सुहास : आई मी आज कॉलेजला नाही जाणार.
आई : सुहास तुला कॉलेजला जावच लागेल.
सुहास : नाही आई मी नाही जाणार.
आई : मला दोन कारणे सांग तुला का नाही जायचं .
सुहास : सगळी मुलं माझा राग करतात. सगळे शिक्षकही माझा राग करतात.
आई : चल ऊठ आणि तयार हो.
सुहास : मला दोन कारणे सांग. मी कॉलेजला का जावं.
आई : तुझं वय आता ५५ वर्षे आहे . तू कॉलेजचा प्राचार्य आहेस.

सात ससे

शिक्षक : बाळू समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससे आणखी दोन ससे दिलेत तर तुझ्याकडे एकूण किती ससे झालेत ?
बाळू : सात.
शिक्षक : परत ऎक, समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससे आणखी दोन ससे दिलेत तर तुझ्याकडे एकूण किती ससे झालेत ?
बाळू : सात.
शिक्षक : आपण उदाहरण बदलु या. समजा मी तुला दोन संत्री दिलीत आणखी दोन संत्री आणखी दोन संत्री दिलीत तर तुझ्याकडे एकूण किती संत्री झालीत ?
बाळू : सहा.
शिक्षक : शाब्बास, संत्री सहा तर तुझ्याकडे ससे कसे सात होणार ?
बाळू : माझ्याकडे अगोदरच एक ससा आहे नां !

प्रश्न एक उत्तरं दोन

संता आणि बंता गुरुद्वारातून परत येता येता गोष्टी करत होते. संताने बंताला विचारले, '' मी एक चेन स्मोकर आहे आणि मला दोन मिनिटंही स्मोकींग केल्याशिवाय होत नाही मला घरी देवाची पुजा करायला जवळपास एक तास लागतो... मग पुजा करतांना स्मोकींग करणे योग्य आहे का?''
बंता म्हणाला, '' तू एक काम कर उद्या जेव्हा आपन गुरुद्वारात जावू तेव्हा आपल्या धर्मगुरुला विचार''
दुसऱ्या दिवशी संताने गुरुद्वारात गेल्यावर संधी साधून आपल्या धर्मगुरुला विचारले, '' गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा आहे''
गुरुजी '' विचार बेटा''
संता '' गुरुजी मी देवाची आराधना करतांना स्मोकींग करु शकतो का?''
गुरुजीने उत्तर दिले, '' बेटा नाही... तु तसं करु शकत नाही .. कारण त्यामुळे आपल्या देवाचा अपमान केल्यासारखं होईल''
संता बंताकडे गेला आणि त्याने बंताला गुरुजीने दिलेले उत्तर सांगितले.
बंता म्हणाला, '' लेका तू प्रश्न चुकिच्या पध्दतीने विचारला म्हणून तुला हे उत्तर मिळाले ... आता बघ मी तोच प्रश्न कसा विचारतो''
बंता धर्मगुरुकडे गेला आणि त्याने गुरुजीला प्रश्न विचारला, '' गुरुजी मी स्मोकींग करतांना देवाची आराधना करु शकतो का?''
गुरुजीने उत्तर दिले, '' बेटा तु स्मोकींग करतांना देवाची आराधना जरुर करु शकतो... देवाच्या आराधनेला वेळ काळ याचे काही बंधन नसते... जेव्हा केव्हा तुला देवाची आराधना करावीशी वाटली तेव्हा तु ती जरुर करु शकतोस''

जंगलबूक

जंगलामध्ये वाघ आणि माकड यांचं बोलणं सुरू असतं .
वाघ : अरे यार , हे चॅनलवाले म्हणजे वैतागच आहे . जेव्हा बघावं तेव्हा जंगलात येऊन आमचं शूट करत असतात .
माकड : का रे , काय झालं ?
वाघ : अरे , प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते की नाही राव , अन वरनं हेच बोलणार की वाघांची संख्या कमी झाली आहे ! आता आम्ही करावं तरी काय !

तीन भाषा बोलणारा पोपट

गंपू एकदा प्राणीसंग्रहालयात जातो. तिथे पोपटाच्या पिंजऱ्यापुढे ' तीन भाषा बोलणारा पोपट ' असं लिहिलेलं असतं. गंपू त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो.
गंपू :- हू आर यू ?
पोपट :- आय अॅम पॅरट
गंपू :- तुम कौन हो ?
पोपट:- मैं तोता हुं.
गंपू :- ( उत्साहाने) तू कोण आहेस ?
पोपट :- डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?

सिलेंडरची कनेक्शन्स

मुलगा : आय लव्ह यू

मुलगी : चल रे , तोंड बघितलं का आरश्यात!

मुलगा : तोंड काय पाहतेस ? माझ्याकडे गॅस सिलेंडरची ३ कनेक्शन्स आहे.

मुलगी : आय लव्ह यू माझ्या राजा.

कारण

एकदा लोकल ट्रेनमध्ये टीसी पाच बायकांना पकडतो

पहिल्या बाईने साडी घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ४०० रुपये घेतो

दुस - या बाईने जीन्स घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ३०० रुपये घेतो

तिस - या बाईने हाफ टॉप आणि स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी २०० रुपये घेतो

चौथ्या बाईने तिसरीच्या स्कर्टपेक्षा लहान हाफ स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी १०० रुपये घेतो 



...

...

...

मग टीसी पाचव्या बाईकडे जातो , पण तिच्याकडून पैसे घेत नाही

...

...

...

कारण पाचव्या बाईकडे तिकीट असते

विचार बदला , देश बदलेल  



Monday 18 February 2013

पत्नी से या प्रेमिका से करते हैं ज्यादा प्यार

             पत्नी से या प्रेमिका से करते हैं ज्यादा प्यार 



एक बार पप्पू, गोलू और राजू इस बारे में चर्चा कर रहे होते हैं कि किस देश के आदमी कैसे होते हैं!

पहले पप्पू ने जापानी लोगों के बारे में बताया.

पप्पू: इनकी एक पत्नी और एक गर्लफ्रेंड होती है, लेकिन वह अपनी पत्नी को ज्यादा पसंद करते हैं!

उसके बाद गोलू ने अमेरिकी लोगों के बारे में बताया.

गोलू: इनकी एक पत्नी और एक गर्लफ्रेंड होती है, लेकिन वह अपनी गर्लफ्रेंड को ज्यादा प्यार करते हैं.

सबसे अंत में राजू की बारी आई तो वह कुछ देर सोच में पड़ गया और कुछ देर के बाद भारतीयों के बारे में बोलना शुरू किया.

राजू: इनकी एक पत्नी और चार गर्लफ्रेंड होती है, लेकिन यह अपने घर की नौकरानी से ज्यादा प्यार करते हैं! 




Read Online Kundali 





ladki patane ke tarikeHindi Jokes - वैलेंटाइन कार्ड

लड़की (दुकानदार से): भैया आप के पास ऐसा वैलंटाइन कार्ड है जिसमें लिखा हो…

यू आर माई फर्स्ट एंड लास्ट लव‘?

दुकानदार: हां है.

लड़की: ठीक है, 50 दे दो. 






Read Love Storis  



Pati Patni Hindi Jokes – पत्नी है या चिड़ियाघर की आइटम

पत्नी (पति से): कॉलेज के दिनों में लड़के मुझे घूर-घूर कर देखा करते थे.
पति: मैं तो पहले से ही कहता था कि तुम्हें यहां नहीं किसी अजायबघर में होना चाहिए था. 




Read devotional  




Hindi Jokes- संता की समझदारी

संता प्लेन में पाइलट से हैडफोन छीन रहा था.

पायलट: यह क्या कर रहे हो?

संता: अबे गधे, टिकट के पैसे दें हम और गाने तू अकेले सुन रहा है.   



Read .............Shree Saptashrung Nivasini Devi Tru..................... 





Pati Patni Hindi Jokes – गांव की पत्नी

पप्पू: तेरी बीवी को इंग्लिश आती है क्या?

संता: नहीं, वह गांव की है.

पप्पू: अच्छा, मेरी तो पर्सनल है. 


Read ......................... Agrowon ......................................................... 






Sunday 17 February 2013

पुनर्जन्मावर

बॉस:- चम्या, तुझा पुनर्जन्मावर विश्वास
आहे का रे?

चम्या:- अजिबात नाही, असे
होऊच शकणार नाही.

बॉस:- ओह्ह्ह,
...
काही नाही... काल तू ज्या काकांचे मृत्यूचे
कारण सांगून दुपार नंतर हाफ डे घेतलास ते
संध्याकाळी ऑफिस मध्ये आले होते.... बॉस
मदहोश.... चम्या. . . . बेहोश...

श्री रवळनाथाची मनी ऑर्डर

श्री रवळनाथाची मनी ऑर्डर

वाडीच्या पोष्टात एक पत्र येता, सॉरटिंग करताना पोस्टमन पत्तो बघता तर "श्री देव रवळनाथ, मु.पो. स्वर्ग" सगळे हसतत, गंमत म्हणान पोस्टमन पुढचा वाचता "देवा रवळनाथा, बाबीच्या आयेचो नमस्कार. बाबी बायलेक घेवन मुंबैक गेलो तेवा पासून एक पैसो पाठवल्यान नाय तीन म्हयन्यात, माझी अगदीच इटमणा झाली रे देवा, माझ्या पोटा पाणयाचा काय करू? गेले दोन दिवस नुसती पेज आणि तोराची चटणी खावन काढलंय. काल मिरगाच्या दिवसाक सगळी कोंबडी सुदा चोरयेक गेली. काळू गाय लोकाचो तरवो खावन आपलो दिवस काढता. पण असा आणि किती दिवस चलताला? तेवा कायतरी सोय कर लवकर. वाट बगतंय."

सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येता. पोष्टाचे लोक कदी नाय ती सोमती वरगणी काढतत. ९० रुपये जमा जातत. पोस्टमन बाबीच्या आयेक नेवन दिता. रवळनाथ पावलो आणि सोमती मनीऑर्डर केल्यान बाबीच्या आयेक वायचं बारा दिसता.

दोन दिवसांनी परत बाबीच्या आयेचा एक पत्र पोष्टात येता. पोस्टमन वाचूक सुरवात करता "देवा रवळनाथा, पावलस रे बाबा अडीअडचणीक, पैशे पोचले. पण माझी एक तक्रार आसा. माका म्हायती आसा तू १०० रुपये पाठवल आसतंलस ते. पण पोष्टातल्या लोकांनी माका ९० रुपयेच दिले आणि १० आपण खाल्यानी. चोर मेले. वाटोळा कर मेल्यांचा."

डॉक्टर - पेशंट



डॉक्टर - तुमच्या आजाराचं नक्की कारणच समजत नाहीय. . . कदाचित दारु पिण्याने असं होत ... असेल. . . . पेशंट - हरकत नाही , मला काही घाई नाही. तुमची उतरली की येत...

पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर....

पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेलेलव्ह लेटर.... प्रिय. अंजु. . . . .लव्ह लेटर पाठवण्यासकारण की,मला तु खुप आवडतेस..तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस...म्हणुन मला वाटतंय,मी पण तुला आवडतो.. .मी जर तुला आवडत असेनतर,मला गणिताच्या पेपरला मदत कर...तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ,तुझ्या मागं मंदाकिनी बसतेना...ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई सोडते, मला तिचा खुप राग येतो...ती माझ्या घराशेजारीचं राहते,शाईचा बदला घ्यायचाम्हणुन...

जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे

जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवेकोणावरही करा गुलाबावरच का काट्यांवरही कराखाच खाळग्यांनी भरलेल्या वाटांवर कराआनंदात सगळेच जगतात दुखातही जगायला हवेजीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!१!!माणसे माणसांना मारतातस्वताच्या सुखासाठी नको ते करताततुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवाहेच आता घडायला हवेजीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!२!!हे मला हवे ते मला हवेपैश्याच्या माजावर काहीही विकत घ्यावेगरिबाने मग कुणाकडे...

बायको ... गण्या

बायको : काय हो, मी जेव्हा गाणं गात असते, तेव्हा तुमी घराबाहेर का जाता? ... ... ... .. गण्या : कारण शेजार्याना असं वाटू नये की, मी तुझा गळा दाबतो...

टीचर :पिँट्या


टीचर : यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मुलानो यातून तुम्ही काय बोध घेणार...? . . . . . पिँट्या : हाच कि.... अभ्यास सोडा आता आणि तशी स्त्री शोधायला चला बाहेर.....

शेजारच्याकाकू

मुलगा(शेजारच्याकाकू ला): काकू,आई ने १ वाटी साखर सांगितली आहे... . . काकू(हासत-हासत):बरं....आणखी काही सांगितले आई ने?? . . मुलगा: हो...... . . त्या टवळी ने नाही दिली तर,समोरच्या जाडी कडून आण.....

Marathi shivi

lagna jhaleli mulgi

संता- बंता .......... Santa - Banta jokes :)

संता- बंता .......... Santa - Banta jokes :)

संता : अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.

बंता : वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे. मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?

संता : त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 'ताई' असंच ठेवलंय.


♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

संता, बंता आणि गुरमीत तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेत. अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते. तो वैतागून शिट्टी वाजवतो.
बंता त्याला सांगतो. अरे वेडाच आहेस. आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार?

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

पाडव्याचं गिफ्ट हवं म्हणून गर्लफ्रेण्ड संताकडे हट्ट धरते. दोघे ज्वेलरी शॉपमध्ये जातात. तिला हिरा असलेली अंगठी आवडते. संता हळूच किंमत विचारून घेतो. दुकानदार सांगतो दहा हजार. एवढी किंमत ऐकून संता शिट्टी वाजवतो. गर्लफ्रेण्ड दुसरी अंगठी पाहते, संता दुकानदाराकडे पाहतो. दुकानदार म्हणतो, दोन शिट्टया.





♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

संता ऑफिसात आला. त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, 'काय हे?' संता एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता.

बॉसने फर्मावलं, आधी घरी जा आणि बूट बदलून ये.

संता बापुडवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब, घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट ठेवलाय.

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥


बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?

संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली.

बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?

संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या. मी आता तुमच्यावर ओरडणार नाही.