Wednesday 9 October 2013

ऊस

प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - हो का? बरं.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - अगं हो...कळलं ना.

मग काय???

शेवटी आई कंटाळून तिला ऊस आणून देते.

उर्जा


गुरूजीः ऊर्जेची व्याख्या सांग बंड्या?

बंड्याः गुरूजी, पूर्ण व्याख्या येत नाही. फक्त शेवट-शेवटची येते.

गुरूजीः असू दे. येते तेवढी सांग बघू.

बंड्या. ओके. ..... तर याला आपण ऊर्जा असे म्हणतो!

दहा तोंडं

दशानन रावण : अरे भूक लागली आहे रे. काही खायला आहे का?

कुंभकर्ण : नाही रे. काहीच नाही माझ्याकडे.

बिभीषण : कुंभा, खोटं का बोलतोस रे... तुझ्याकडे दहा लाडू आहेत की.

कुंभकर्ण : गप्प बस... त्याला दहा तोंडं आहेत. एका घासात संपवेल तो. आपण राहू उपाशीच...

- ढग्गोबाई

ओन्ली रजनीकांत

एक भूत मध्यरात्री १२ वाजताच्या ठोक्याला दुसऱ्या भुताला म्हणाला , उगाच थरथर कापू नकोस. वेड्यासारखा घाबरू नकोस. अरे , या जगात रजनीकांत-वजनीकांत काही नसतं रे...

अविस्मरणीय गिफ्ट

गंपू आणि गंपूची बायको कारच्या एका शोरुम जवळून जात असतात.

गंपूची बायको - तुम्ही मला लग्नाच्या वाढदिवशी काय गिफ्ट द्याल ?

गंपू - बोल , काय पाहिजे तुला ?

गंपूची बायको - असं काहीतरी द्या की एकपासून ते शंभरपर्यंत चार-पाच सेकंदांत पळू शकेल.
....

गंपूने पुढच्या दुकानात जाऊन एक वजनाचा काटा विकत घेतला आणि तिला गिफ्ट दिला.

असिस्टंट

असिस्टंट - सर, तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये नेहमी लग्न झालेल्या लोकांनाच का घेता?

बॉस - कारण एक तर त्यांना बोलणी ऐकायची सवय असते. शिवाय घरी जायची घाईही नसते.

डायरी

इंटरनेट-अॅडिक्ट गंपूची डायरी ...
' काल रात्री इंटरनेट डाऊन झालं होतं .... मग घरच्यांशी बोललो थोडा वेळ ... बरे वाटले हे लोक ...'

झंप्या

झंप्या - बाबा, मला लग्न करायचं नाही. मला मुलींची-‌स्त्रियांची भीती वाटते.

बाबा - अरे एकदा करून टाक. मग कुणातरी एकीचीच भीती वाटेल...बाकीच्यांची नाही वाटणार.

- ढग्गोबाई

पाठलाग

प्रियकर : सुंदर मुली कधीच कोणत्या मुलाच्या मागे धावत नाहीत.
प्रेयसी : कशावरून ?
प्रियकर : पिंजरा कधी उंदराच्या मागे धावलेला पाहिला आहेस का तू ?

व्हॉट्स अप!!


सध्या लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅप या कम्युनिकेशन अॅपवरील काही मजेशीर स्टेटस मेसेज..

ड्रायव्हिंग - हा गेल्या आठवड्यापासून ड्रायव्हिंग करतोय.. बहुतेक दुबईला पोहोचला असेल ...
स्लीपिंग - हा गेल्या तीन दिवसांपासून झोपलाय ... जिवंत आहे ना ?
हॅपी न्यू इयर - ऑक्टोबर उजाडला , तरी त्याचे स्टेटस हे आहे ... बहुतेक न्यू इयर पार्टीच्या मूडमधून बाहेर आलेला नाही ...
हॅपी - गेल्या महिन्याभरापासून हा मेसेज आहे.. हा भाई बहुतेक स्वर्गातच राहत असावा..
कांट टॉक , व्हॉट्स अॅप ओन्ली - अरे फोन आणि एसएमएससारख्या बेसिक गोष्टींसाठी मोबाइल वापरत नाहीस , तर फेकून दे ना!

गोपालसिंग

अमेरिकेत एका बीचवर गोपालसिंग पहुडलेला असतो.
तिथे एक अमेरिकन येऊन त्याल विचारतो , ' आर यु रिलॅक्सिंग ?'
गोपालः नाही ... आय अॅम गोपाल सिंग ...
थोड्या वेळाने दुसरा अमेरिकन येऊन तेच विचारतो , ' आर यु रिलॅक्सिंग ?'
शेवटी गोपाल वैतागतो आणि उठून निघून जातो. तेवढ्यात त्याला एक अमेरिकन जवळच पहुडलेला दिसतो.
गोपालः आर यु रिलॅक्सिंग ?
अमेरिकनः येस ...
गोपालः मग जा , सगळे तुलाच शोधताहेत!

Friday 4 October 2013

एक गोंडस मागणी

एक गोंडस मागणी
एक छोटीशी मुलगी वडिलावर चिडून घराबाहेर बसली होती..
आई-: काय झाल...
मुलगी:- तुझ्या नवरा सोबत
माझ पटत नाही मला माझा नवरा पाहिजेल... 





Photo: ♥ एक गोंडस मागणी ♥
एक छोटीशी मुलगी वडिलावर चिडून घराबाहेर बसली होती..
आई-: काय झाल...
मुलगी:- तुझ्या नवरा सोबत
माझ पटत नाही मला माझा नवरा पाहिजेल...
♥♥Lonely♥♥
Pooja Ghumre

चोर पकडायची एक मशीन बनवली।

चोर पकडायची एक मशीन बनवली।
.
अमेरिका मध्ये एका दिवसात मशीन ने 9 चोर पकडले ।
.
चीन मध्ये 5 तासा मध्ये 30चोर पकडले गेले ।
.
इंडिया मध्ये मशीन आली।
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इकडे
तासा भरात मशीनच चोरी झाली।
.
इंडिया इज़ द बेस्ट।