Wednesday 27 February 2013

प्रश्न एक उत्तरं दोन

संता आणि बंता गुरुद्वारातून परत येता येता गोष्टी करत होते. संताने बंताला विचारले, '' मी एक चेन स्मोकर आहे आणि मला दोन मिनिटंही स्मोकींग केल्याशिवाय होत नाही मला घरी देवाची पुजा करायला जवळपास एक तास लागतो... मग पुजा करतांना स्मोकींग करणे योग्य आहे का?''
बंता म्हणाला, '' तू एक काम कर उद्या जेव्हा आपन गुरुद्वारात जावू तेव्हा आपल्या धर्मगुरुला विचार''
दुसऱ्या दिवशी संताने गुरुद्वारात गेल्यावर संधी साधून आपल्या धर्मगुरुला विचारले, '' गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा आहे''
गुरुजी '' विचार बेटा''
संता '' गुरुजी मी देवाची आराधना करतांना स्मोकींग करु शकतो का?''
गुरुजीने उत्तर दिले, '' बेटा नाही... तु तसं करु शकत नाही .. कारण त्यामुळे आपल्या देवाचा अपमान केल्यासारखं होईल''
संता बंताकडे गेला आणि त्याने बंताला गुरुजीने दिलेले उत्तर सांगितले.
बंता म्हणाला, '' लेका तू प्रश्न चुकिच्या पध्दतीने विचारला म्हणून तुला हे उत्तर मिळाले ... आता बघ मी तोच प्रश्न कसा विचारतो''
बंता धर्मगुरुकडे गेला आणि त्याने गुरुजीला प्रश्न विचारला, '' गुरुजी मी स्मोकींग करतांना देवाची आराधना करु शकतो का?''
गुरुजीने उत्तर दिले, '' बेटा तु स्मोकींग करतांना देवाची आराधना जरुर करु शकतो... देवाच्या आराधनेला वेळ काळ याचे काही बंधन नसते... जेव्हा केव्हा तुला देवाची आराधना करावीशी वाटली तेव्हा तु ती जरुर करु शकतोस''

No comments:

Post a Comment