Wednesday, 27 February 2013

स्वल्पविराम

एकदा ना. सी. फडके अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?

त्यावर ते म्हणाले, योग्य वेळ आल्यावर मी सांगीन, त्यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता,

ते म्हणाले, " मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ."

ही गोष्ट लगेचच सौ. फडकेंनी श्री. फडक्यांच्या कानावर घातली.

त्यांनी अत्र्यांकडे याबाबत विषय काढला, तेंव्हा अत्र्यांनी स्पष्टिकरण दिले,

"मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ. "

No comments:

Post a Comment